

Major Leakage in Warje Water Pipeline
Sakal
शिवणे : खडकवासला येथून वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी मुख्य जलवाहिनी वारजे–कर्वेनगर हद्दीतील श्रमसाफल्य कॉलनी परिसरात लिकेज झाल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला आहे. जमिनीखालील या मुख्य जलवाहिनीतील गळती गुरुवारी उशिरा निदर्शनास आली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने तातडीने खडकवासला येथील पंपिंग बंद केले आहे.