

Night Schools in Pune Struggle Amid Staff Crunch, Students' Education at Stake
sakal
पुणे: शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे दिवसभर काम करूनही शिक्षणाची ओढ असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी असणाऱ्या ‘रात्रशाळा’ आता संकटात सापडल्या आहेत. अपुरे शिक्षक आणि सध्या असणाऱ्या पूर्णवेळ-अर्धवेळ शिक्षकांच्या समस्या यामुळे रात्रशाळांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.