
MCOCA Accused Musab Shaikh Arrested with a Large Cache of Ganja; Accomplice Tejas Dangi Also Nabbed.
Sakal
पुणे : कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार आणि ‘मकोका’च्या गुन्ह्यातील आरोपी मुसाब शेख याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ८७८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्याचा साथीदार तेजस डांगी यालाही ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली.