Nirmal Toys : रिअल हिरोजची माहिती देणारे ‘निर्माण टॉईज’

स्पायडरमॅन, हल्क, आयर्नमॅन, बॅटमॅन, ब्लॅक पँथर, थोर असे एक ना अनेक सुपरहिरोज् लहान मुलांना माहिती आहेत.
Kedar Satpute and amol kulkarni
Kedar Satpute and amol kulkarnisakal
Summary

स्पायडरमॅन, हल्क, आयर्नमॅन, बॅटमॅन, ब्लॅक पँथर, थोर असे एक ना अनेक सुपरहिरोज् लहान मुलांना माहिती आहेत.

पुणे - स्पायडरमॅन, हल्क, आयर्नमॅन, बॅटमॅन, ब्लॅक पँथर, थोर असे एक ना अनेक सुपरहिरोज् लहान मुलांना माहिती आहेत. त्यांची स्टोरी काय आहे. ते कोणत्या सिमेनात आहेत. त्यांनी जगाला कसे वाचवले याचे काल्पनिक किस्से अगदी तोंडपाठ असतात. मात्र, यातील अनेकांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या मावळ्यांचे जीवन आणि त्यांनी केलेले पराक्रम सविस्तरपणे माहिती असतीलच असे नाही.

सुपरहिरोजचे चित्रपट, त्यांच्यावर आधारित विविध खेळणी यामुळे ते घराघरांत पोचले आहे. या विद्यार्थ्यांना आपले रिअल हिरोज्, ज्यांनी प्रत्यक्षात अनेक पराक्रम केले आहेत. अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि आपल्या कर्तृत्वाचे झेंडे अटकेपार फडकवले आहेत, त्यांची ओळख व्हावी म्हणून ॲक्शन फिगर (टॉईज)च्या माध्यमातून लहान मुलांमध्ये शिवाजी महाराज, मावळे यांच्याबद्दल माहिती देणारे ‘निर्माण टॉर्इज’ (Nirman Toys) हे स्टार्टअप दोघा मित्रांनी सुरू केले आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत १५ हजारांहून अधिक टॉईजची निर्मिती केली आहे.

विशेष म्हणजे त्यासाठी आवश्‍यक असलेला कच्चा माल पूर्णत: भारतीय बनावटीचा असून त्या माध्यमातून ४० ते ५० जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध झाला आहे. मॅकेनिकल इंजिनिअर असलेले केदार सातपुते आणि फाइन आर्टचे शिक्षण घेतलेले डिझायनर अमोल कुलकर्णी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पुण्यात या स्टार्टअप सुरुवात केली आहे. सातपुते यांनी सुमारे १५ वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी केली आहे. तर कुलकर्णी यांची डिझाइनिंगची कंपनी आहे. गेल्या १२ वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.

फूड ग्रेड प्लास्टिकचा वापर

कोणतेही खेळणे किंवा मूर्ती बनवायची असेल तर त्यासाठी प्लास्टिक आणि माती प्रामुख्याने वापरली जाते. मातीची खेळणी लवकर तुटण्याची आणि प्लास्टिकचे खेळणे मुलांनी तोंडात घातल्यानंतर त्यांना त्रास होण्याची किंवा मुल आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे स्टार्टअप फूड ग्रेड प्लास्टिकचा वापर करून टॉईज तयार करीत आहे.

प्रमुख उद्देश

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी

  • मुलांमधील इतिहासाबद्दलचे कुतूहल वाढावे

  • विद्यार्थ्यांचा स्क्रीनटाईम कमी व्हावा

  • काल्पनिक जगातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे

परदेशातील सुपरहिरोजपेक्षा आपल्या मातीतील हिरोंची माहिती मुलांना व्हावी. त्यांच्यापासून मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही या स्टार्टअपची निर्मिती केली आहे. यातून विद्यार्थ्यांमधील इतिहासाबद्दलचे कुतूहलदेखील वाढत आहे. या माध्यमातून अकुशल कामगारांना रोजगार मिळाला आहे.

- केदार सातपुते, अमोल कुलकर्णी, भागीदार, निर्माण टॉईज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com