Pune : मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मंत्री गडकरी यांच्या माध्यमातून मार्गी लागणार ; आढळराव पाटील

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकास जोडणाऱ्या या रस्त्याला केंद्रीय मार्ग निधीतून मंजूरी मिळावी
Nitin Gadkari Shivajirao Adhalarao Patil
Nitin Gadkari Shivajirao Adhalarao Patil sakal

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील रखडलेला राष्ट्रीय ,महामार्ग खेड टोलनाका ते नाशिक फाटा या महामार्गावरील एलिवेटेड कॉरिडोर प्रकल्पाचा तांत्रिक प्रक्रियेसह डीपीआर लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करावे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असलेल्या वढू-तूळापूरला जोडणाऱ्या देहू-आळंदी - मरकळ - तूळापूर या ५४ कोटी २२ लाख रुपयांच्या कामास केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत मंजूरी मिळावी.पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापुर ते शिरुर रस्ता रूंदीकरणाचे काम प्राधान्याने करावे. अशी मागणी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.” अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले “गडकरी यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. खेड टोलनाका ते नाशिक फाटा या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे यासाठी सन २०१३ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे माझा पाठपुरावा सुरु आहे. महामार्ग रुंदीकरणासाठी डिसेंबर २०१७ मध्ये गडकरी यांच्याकडून मंजुरी मिळाली होती. एक हजार १३ कोटीं रुपयांची निविदाही मंजूर झाली होती.

मात्र मोशी ते नाशिक फाटा हद्दीतील डीपीआरला आलेल्या हरकतींमुळे सदर निविदा थांबवण्यात आली. फेब्रुवारी २०२० मध्ये पुन्हा ६५० कोटीं रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली. पण काही कारणास्तव थांबविण्यात आली होती. ही बाब निदर्शनास आणून

देत या महामार्गाचे काम प्रक्रियेत अडकून पडल्याने वाढती औद्योगिक वाहतूक व दळणवळणाचा प्रचंड ताण येऊन या भागात सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या महामार्गावरील एलिवेटेड कॉरिडोर प्रकल्पाचा तांत्रिक प्रक्रियेसह डीपीआर लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी मंजुरी मिळावी. अशी मागणी यावेळी केली.”

देहू-आळंदी - मरकळ - तूळापूर राष्ट्रीय महामार्ग ५४ कोटी २२ लाख रुपये कामाचा प्रस्ताव माझ्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास बाब म्हणून मंजूरीसाठी केंद्राकडे शिफारस केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकास जोडणाऱ्या या रस्त्याला केंद्रीय मार्ग निधीतून मंजूरी मिळावी.

अशी मागणी केली. याबाबत राज्य सरकारला सूचना देऊन विहित नमुन्यात प्रस्ताव मागवून मंजुरीसाठी व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. वाघोली, शिक्रापुर, रांजणगाव, शिरुर आदी शहरांतून जाणाऱ्या रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी असलेल्या पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापुर ते शिरुर रस्ता रूंदीकरणाचे कामही लवकरात लवकर सुरू व्हावे. अशी मागणी केली.

पुढील ३० वर्षांच्या वाहतूक कोंडीचा विचार करून येथील महामार्गांचे नजिकच्या काळात रूंदीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाईल. अशी ग्वाही गडकरी यांनी दिली आहे. असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com