esakal | पुणे : चंदननगर येथे ऑइल टँकर उलटला
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : चंदननगर येथे ऑइल टँकर उलटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव : शेरी नगर रस्त्यावर चंदननगर येथे ऑइल (Oil) घेऊन जाणारा एक टॅंकर (tanker) रात्री एक वाजता दुभाजकाला धडकून पलटी झाला आहे. रात्रीपासून टँकरमधून अद्यापही ऑईल गळती सुरू आहे .ऑईल रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरची वाहतूक ही बीआरटी (BRT) मार्गातून वळविण्यात आली आहे.

अपघाताबाबत चालक मनीष गोड म्हणाले, रात्री पाऊस येत होता रस्त्यावर अंधार होता. पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटल्यानंतर चंदननगर येथे एका ट्रॅव्हल बस चालकाने अचानक रस्त्याच्यामध्ये बस आणली. येथे अरुंद रस्ता असल्यामुळे दुभाजकाला टँकर धडकला. टँकर पुण्यातून नगरच्या दिशेने जात होता.

हेही वाचा: काय औकात आहे? चिपी विमानतळाची परवानगी मी आणली - नारायण राणे

संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि येथील वाहतूक वळवण्यासाठी याच कंपनीचा दुसरा टॅंकर रस्त्याला आडवा लावण्यात आलेला आहे. टँकर पलटी होऊन सात तास उलटले तरीही तो सरळ करण्यासाठी किंवा बाजूला हटवण्यासाठी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी अद्यापही पोहोचलेली नाही. नगर रस्त्यावर त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

हेही वाचा: महापालिका रस्त्यावर भटकणाऱ्या बेघरांना देणार कौशल्य प्रशिक्षण

अपघाता विषयी प्रत्यक्षदर्शी नरेश काळे म्हणाले, रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाला आम्ही मदतीसाठी धावलो. ड्रायव्हर आणि त्याच्या मदतनिसालाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर रस्त्यावर उभे राहून काही नागरिकांच्या मदतीने आम्ही वाहतूक बीआरटी मार्गातून वळवली.

पोलीस निरीक्षक अजित लकडे म्हणाले, टँकर सरळ करण्यासाठी क्रेन मागवला आहे.. साडेदहा वाजेपर्यंत टँकर सरळ केला जाईल. तसेच रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर वाहने घसरू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. अशा सूचना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी जागेवर पोहोचलेले आहेत.

loading image
go to top