Pune : पिरंगुटला सातव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

कंपनीतील नोकरी सांभाळून ते येथील परिसरात घरोघरी वर्तमान पत्रे वितरणाचेही काम करीत होते.
accident
accidentsakal

पिरंगुट - पिरंगुट (ता.मुळशी) येथील सातव्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून त्याचे कारण समजू शकलेले नाही.

अमित महालिंग आवळे ( वय ३७ . सध्या रा. अर्बनग्राम सोसायटी , एच विंग. पिरंगुट. ) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मूळ पत्ता गांधी चौक , किसान गल्ली , शिरूर अनंतपाळ , लातूर असा आहे. ते भरे येथील सिमित्सू पॅटर्न या कंपनीत कामाला होते.

कंपनीतील नोकरी सांभाळून ते येथील परिसरात घरोघरी वर्तमान पत्रे वितरणाचेही काम करीत होते. पिरंगुटला ते पत्नी , मुलगा व मुलगी असे कुटुंबासह राहत होते. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com