Pune : नऱ्हे येथे आर्थिक कारणावरून एकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune : नऱ्हे येथे आर्थिक कारणावरून एकाचा खून

पुणे : आर्थिक कारणावरून टोळक्याने एका व्यक्तीला जबर मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाणे येथे 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल राधाकिसन नलवडे (वय 54, रा.भैरोबानाला फातिमानगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुदाम राधाकिसन नलवडे (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून 6 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदाम हा सुनील नलवडे यांचा भाऊ आहे. सुनील हा लष्कर परिसरात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करीत होता. त्याने काही व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. या आर्थिक कारणावरून शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास 5 ते 6 जणांच्या टोळक्याने सुनील यास नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरातील आशा पुष्प शाळेजवळ लाथाबुक्क्याने मारहाण केली. याबाबत रात्री साडे दहा वाजता सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळाली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने सुनील यास उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे तीन वाजता उपचार सुरू असताना सुनील याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.