esakal | Pune : मंगळवारी लसीकरण केंद्रावर कोव्हीशील्डचे २५० डोस
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

Pune : मंगळवारी लसीकरण केंद्रावर कोव्हीशील्डचे २५० डोस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्र शासनाकडून पुणे (pune) शहरासाठी ९० हजार कोव्हीशील्ड लसीचे (covishield vaccine) डोस उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे लसीकरणासाठी प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उद्या (मंगळवारी) १८८ केंद्रांवर प्रत्येकी २५० डोस असणार आहेत. तर ११ केंद्रांवर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी ३०० डोस असणार आहेत. त्यामुळे शहरात एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण होण्याचाही विक्रम होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

यापूर्वी महापालिकेला फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक दीड लाख डोस मिळाले होते. त्याखालोखाल आज ९० हजार डोस मिळाले आहेत. महापालिकेने कोव्हीशील्डचे १८८ केंद्रांवर नियोजन करताना २५० डोस उपलब्ध करून दिले. यापूर्वी एका केंद्रावर २०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध झालेले नव्हते. ९० हजार पैकी ४६ हजार २५० डोस मंगळवारी तर उर्वरित ४३ हजार ७५० डोस बुधवारी वापरले जातील. तसेच विशेष लसीकरण मोहिमेसाठीही वापरले जाणार आहेत. तर कोव्हॅक्सीनचे ६ हजार डोस आले आहेत. शहरासाठी मोठ्याप्रमाणात लस मिळाल्याने दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: कॉसमॉसच्या ‘कॉईन एक्सचेंज’ उपक्रमाद्वारे ५० लाखांची नाणी वितरीत

कोव्हिशिल्ड

  • पहिल्या डोससाठी १५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

  • पहिल्या डोससाठी १५ टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

  • पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (१४जून) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन

  • थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस दुसऱ्या डोससाठी

हेही वाचा: पुणे : बाळ संगोपन रजेवरील महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

कोव्हॅक्सिन

  • पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी १५ टक्के लस

  • पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी १५ टक्के लस

  • १० आॅगस्ट पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्यांना दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

  • दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस उपलब्ध

loading image
go to top