

Modified Silencer Crackdown in Pune Traffic Police Fine 274 Bikers and Seize 84 Illegal Motorcycle Silencers
esakal
पुणे : कर्णकर्कश हॉर्नचा वापर करून नागरिकांची शांतता भंग करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. 'ऑपरेशन मॉडिफिकेशन’ अंतर्गत गेल्या तीन दिवसांत २७४ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.