Pune Orphanage Fire : पुण्यात अनाथ आश्रमाला आग; अग्निशमन दलाकडून १०० मुलांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune Orphanage Fire: पुण्यात अनाथ आश्रमाला आग; अग्निशमन दलाकडून १०० मुलांची सुटका

पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या एका अनाथ आश्रमाला काल (दि.२६) मध्यरात्री आग लागली होती. यामध्ये इमारतीत सुमारे १०० लहान मुलं अडकून पडली होती.

या सर्वांना अग्निशमन दलानं सुखरुप सुटका केली आहे. तसेच त्यांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळं लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. (Pune Orphanage Fire Rescue of 100 children by fire brigade)

हेही वाचा: Russian YouTubers: बापरे! 60 मजली टॉवरवर जीवघेणी स्टंटबाजी; दोन रशियनं युट्यूबर्सना अटक

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, "काल मध्यरात्री कॅम्पमधील मुलांच्या तय्यबिया अनाथ आश्रमात रात्री १२.४० वाजता आग लागल्याची माहिती नियंत्रण कक्षात मिळाली. त्यानंतर मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन आणि देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन ही घटनास्थळी रवाना करण्यात आले"

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

घटनास्थळी पोहोचताच आश्रमच्या चार मजली असणाऱ्या इमारतीत तळमजल्यावर आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. यानंतर या तळमजल्यावर अडकून पडलेल्या सुमारे १०० मुलांना आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवण्यात आलं. ही मुलं ६ ते १६ वयोगटातील आहेत. त्यानंतर दहा मिनिटांत ही आग नियंत्रणात आली. या आगीत इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचं आणि इतर काही साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

टॅग्स :Pune NewsfireOrphanage