Pune Palkhi Traffic Diversion 2026
esakal
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात ११ ते १८ जुलै या कालावधीत वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.