Pashan Sus Road: खोदकामानंतर खड्डा न बुजवल्याने पाषाणकर हैराण
Large Pothole Causes Traffic Trouble on Pashan-Sus Road: पाषाण-सूस रस्त्यावर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठा खड्डा; वाहनचालक व नागरिक त्रस्त. खड्डा अपघातांना आमंत्रण देत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती आवश्यक.
पाषाण : पाषाण-सूस रस्त्यावर पुणे महापालिकेच्या सांडपाणी विभागाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या खोदकामानंतर तयार झालेला मोठा खड्डा अद्यापही न बुजवल्याने नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.