

Modern Vegetable Market Building Abandoned in Pashan-Sus Road
Sakal
पाषाण : पाषाण-सूस रस्त्यावरील सुतारवाडी भागात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेली आधुनिक भाजी मंडईची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना धूळ खात पडून आहे. मंडईचा मूळ उद्देश सफल न झाल्याने काही स्थानिक नागरिकांनी खासगी कामासाठी या इमारतीचा अनधिकृतपणे वापर सुरू केल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.