

Pune Traffic News Bhosari to Undri 23 Km Tunnel and Bhugaon to Erandwane 8 Km Underground Routes Proposed
sakal
पुणे : पुण्याच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे आणि पुढे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी पुणे महापालिकेने भुयारी मार्गांची आखणी केली आहे. ‘पाताळ लोक’ प्रकल्पांतर्गत भोसरी ते उंड्रीदरम्यान २३ किलोमीटर लांबीचा बोगदा केला जाणार आहे. हाच बोगदा पुढे महामेट्रोतर्फे बोपदेव घाटातून पुरंदर विमानतळापर्यंत नेला जाणार आहे. तर भूगाव ते एरंडवणेदरम्यान आठ किलोमीटरचा भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्यास महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मंजुरी दिली आहे.