पुणे : पथारी व्यवसायिकांचे उद्या ‘रोजगार वाचवा’ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

पुणे महापालिकेतर्फे फेरीवाला समितीच्या आठ पदांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

पुणे : पथारी व्यवसायिकांचे उद्या ‘रोजगार वाचवा’ आंदोलन

पुणे - पुणे महापालिकेतर्फे फेरीवाला समितीच्या आठ पदांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. पण १० हजार पथारी व्यावसायिकांचा मतदानाचा हक्क काढून घेतल्याच्या विरोधात तसेच प्रमाणपत्र नोंदणी रद्द करू नये या मागणीसाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात उद्या (ता. ९) महापालिकेपुढे सकाळी ११ वाजत ‘रोजगार वाचवा’ आंदोलन केले जाणार आहे.

एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार लाखो रोजगार निर्माण करण्याचा दावा करत आहे. मात्र त्याच वेळी सध्या राज्य सरकारचे प्रतिनिधी असलेल्या महापालिका आयुक्तांच्या प्रशासनाखाली असलेल्या पुणे मनपाने ऑगस्ट २०२२ ला फेरीवाला समितीसाठी जाहीर केलेली पथारी व्यवसायांची अंतिम मतदार यादीमधून दहा हजारावर मतदारांची नावे तर वगळली आहेत. पण त्याचबरोबर या पथविक्रेत्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणार आहोत, असेही नुकतेच जाहीर केले आहे. हा निर्णय मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी महापालिका भवनासमोर ‘रोजगार वाचवा’ आंदोलन केले जाणार आहे.