पुणेकरांसाठी खुशखबर! पाच शहरांसाठी सुरू होणार नॉन स्टॉप विमानसेवा

SpiceJet.
SpiceJet.
Updated on

पुणे- पुणेकर आता देशातील पाच मोठ्या शहरांपर्यंत विमानाने नॉन स्टॉप प्रवास करु शकणार आहेत. दरबंगा, दुर्गापूर, ग्वालैर, जबलपूर आणि वाराणसी या पाच शहरांसाठी पुण्यातून विमानसेवा सुरु केली जात आहे. डोमेस्टिक एअरलाईन स्पाईसजेटने पुण्यातून 5 शहरांना विमानाने विना थांबा पोहोचता यावे यासाठी योजना बनवली आहे. पीटीआयने यासंदर्भातील माहिती दिली. कंपनीने शुक्रवारी घोषणा केली की, कंपनी कमीतकमी 66 नव्या फ्लाईट्स सुरु करणार आहे. शिवाय काही विशिष्ट मार्गासाठी अधिकच्या फ्लाईट सुरु करण्यात येतील. २८ मार्चपासून ही योजना सुरु करण्यात येत आहे. मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.  

स्पाईसजेटच्या चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया म्हणाल्या की, 'आम्हाला आनंद होतोय की प्रवाशांसाठी आम्ही अधिकच्या फ्लाईट्स घेऊन येत आहोत. उन्हाळ्यात आम्ही 66 नव्या फ्लाईट्स घेऊन येत आहोत. स्पाईज जेट प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या नव्या पाऊलामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आमची असणारी बांधिलली दाखवून देते.'

छोट्या शहरांमधूनही लोकांच्या विमान प्रवासाची मागणी वाढावी यासाठी UDAN योजनेअंतर्गत स्पाईसजेट जोडले गेले होते. एअरलाईनने आता दरबंगा, दुर्गापूर, ग्वालैर आणि नाशिकला मेट्रो शहरांसोबत जोडण्यासाठी नव्या फ्लाईट्स सुरु केल्या आहेत, असं स्पाईसजेट कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हणण्यात आलंय.अहमदाबाद-दरबंगा-अहमदाबाद,हैदराबाद-दरबंगा-हैदराबाद, पुणे-दरबंगा-पुणे आणि कोलकाता-दरबंगा-कोलकाता अशा फ्लाईट्स सुरु करण्यात येत आहेत. याआधी मुंबई, दिली आणि बेंगलुर या मेट्रो शहरांना दरबंगासोबत जोडण्यात आले होते. 

दुर्गापूर शहराला चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या मेट्रो शहरांनी जोडण्यात आलं होतं. आता पुणे ते दुर्गापूर अशी विमानसेवा सुरु केली जाणार आहे. झारसुगुडा शहराला चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांसोबत जोडण्यात आलंय. ग्वालैर याआधी हैदराबाद, जम्मू, बेंगळुरु, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली या शहरांसोबत जोडले गेले होते. आता पुणे ते ग्वालैर अशीही विमानसेवा सुरु करण्यात येईल. नाशिक शहरावरुन दिल्ली, हैदराबाद आणि बैंगळुरु या शहरांना जाण्यासाठी स्पाईसजेट सुविधा सुरु करण्यात आली होती. आता कोलकाता शहरासाठीही फ्लाईट सुरु करण्यात येईल. स्पाईसजेटने असंही सांगितलंय की, अहमदाबाद, बेंगळुरु आणि कोलकाता या शहरांना श्रीनगरशी जोडण्यासाठी विमानसेवा सुरु करण्यात येईल. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Notional Increment Approved for Retired Teachers Bombay High Court Decision Brings Pension and Gratuity Relief
Karvenagar Missing Child Found Safe in One Hour Pune Police and Citizens Successful Search Operation
NCP Maharashtra Women Wing Gets New Chief Vaishali Nagawade Succeeds Rupali Chakankar in Key Party Role
Marathi News Esakal
www.esakal.com