

Pune kidnapping case
esakal
Pune Crime: पुण्यातील पेरूगेट पोलीस चौकीच्या हद्दीतून २८ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री डायल ११२ वर आलेल्या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या ५३ मिनिटांत तरुणाची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत.