
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ५४ वे प्रदेश अधिवेशन उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले.
पुणे : देशापुढे नागरिका नोंदणीला विरोध केला जात असताना क्रांतीकारक उद्धम सिंग, भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान वाया जाणार का? आपल्याला देश धर्मशाळा बनविणार का? देशात भारत माता की जय म्हणणारेच राहू शकतील, असे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ५४ वे प्रदेश अधिवेशन उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. महानगर मंत्री अनिल ठोंबरे, एमजीएमएनएलचे अध्यक्ष स्वागत समिती सचिव राजेश पांडे, महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहण अरुनिमा सिन्हा, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, महानगर अध्यक्ष डॉ. शरद गोस्वामी, प्रा. सारंग जोशी, प्रमोद चौधरी या वेळी उपस्थित होते.
पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा
काय म्हणाले प्रधान?
प्रधान म्हणाले, 'काही असमजदार लोकांमुळे, राजकारणामुळे देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. इतर देशात लोकशाही असली तरी, अनेक गोष्टींवर बंधने आहेत. आपल्या देशात बंधने नसल्याने लोकशाही महान आहे. भारतात विचार भिन्नता, वैचारिक मतभेद आहेत. अशा वेळी देशात नागरिकता नोंदणी व्हावी की नाही यावरून वाद सुरू आहे. जगातील सर्व देशात लोकांची नोंदणी आहे.आपल्या देशातील लोकांची माहिती आपल्याकडे असतील पाहिजे. देशात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांना रोखण्यासाठी 'अभाविप'वर महत्वाची जबाबदारी आहे.'