नागरिकांनी शांतता, संयम बाळगावा

नागरिकांनी शांतता, संयम बाळगावा
Published on

पुणे, ता. १८ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (ता. २०) पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे. या संपामुळे शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता शांतता व संयम बाळगावा, असे ‘एफडीए’चे पुणे विभागाचे सहआयुक्त (औषधे) गि. दि. हुकरे यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात ‘एफडीए’ने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. बंदच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासकीय रुग्णालये, रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने (मेडिकल्स), आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणारी दुकाने आणि जेनेरिक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी औषधांच्या तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
औषध दुकानदारांना ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून परवाने मंजूर केले जातात. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध व्हावीत, हा यामागील मुख्य उद्देश असतो. त्यामुळे या बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक आहे. प्रशासनाकडून संबंधित कायद्याची आणि आदेशांची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याने सर्व केमिस्ट बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये, अशी तंबीही सहआयुक्त हुकरे यांनी दिली आहे.

येथे साधा संपर्क
रुग्णांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या खालील सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रु. वि. पोंगळे : ९७३००८५५८८
स. कृ. तितर-दातीर : ८६०५०००४६०
आ. आ. रासकर : ८६५२५८३५२५
सं. मा. राठोड : ९९२३३०४६५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com