Pune Photo Exhibition : छायाचित्रकारांमुळे समजला देशाचा इतिहास : प्रणिती शिंदे
History through Photography : पुणे फेस्टिव्हल व श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने ३०० छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले असून खासदार प्रणिती शिंदे यांनी छायाचित्रकारांना इतिहासाचे रक्षक ठरवले.
पुणे : ‘‘छायाचित्रांमुळे देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. छायाचित्रकार नसते तर कदाचित इतिहास कधीच समजला नसता. त्यामुळे इतिहास जपण्याची व टिपण्याची जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे,’’ असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केले.