

Deemed Conveyance Success in Pune
Sakal
पुणे : सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मालकी हक्काबाबत दशकांपासून असलेली अडचण मानीव अभिहस्तांतरणामुळे (डीम्ड कन्व्हेयन्स) दूर होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी मालकी हक्क (कन्व्हेयन्स) करून न दिलेल्या पाच हजार ९२७ सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’चा (मानीव अभिहस्तांतरण) आधार घेत मालकी हक्काची कागदपत्रे मिळवली आहेत.