

FDA Inspections in Pune Pimpri Six Hotel Bakery Licenses Suspended and 598 Kg Mawa Seized Over Food Safety Violations
sakal
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल, बेकरी, रेस्टॉरंट यांची तपासणी केली असता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे परवाने निलंबित केले. याशिवाय कोंढवा बुद्रुक परिसरात विनापरवाना वाहतूक केला जाणारा ५९८ किलो मीठा मावा जप्त केला असून, त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.