Pune–Pimpri Civic Polls
esakal
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती आहे. सुरुवातीला दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर शरद पवार गट महाविकास आघाडीबरोबर लढणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, आता यात मोठा ट्विस्ट बघायला मिळाला असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाही बघायला मिळते आहे.