
"100 Women Trained as Pink Rickshaw Drivers in Pune"
Sakal
पुणे : झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे झेन्सार फाउंडेशन व आस्था सोशल फाऊंडेशन यांच्या पुढाकारने व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने शहर परिसरातील शंभर महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण, बॅच, तसेच परवाना देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पिंक रिक्षा उपक्रमामुळे लाभार्थी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत झाली आहे. खराडी येथील झेन्सार कंपनीच्या प्रांगणात सहभागी महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र व पहिल्या टप्प्यात वीस जणींना अर्थसाहाय्यातून पिंक रिक्षा देण्यात आल्या.