Pune Development: पुण्यात १२५० कोटींच्या कामांचा धडाका; आचारसंहितेपूर्वी होणार लोकार्पण, भूमिपूजन, महापालिका आयुक्तांकडून आढावा
Pune to Inaugurate Major Projects Before Model Code: पुणे महापालिकेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तब्बल १२४९ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा जलद धडाका सुरू झाला आहे. प्रमुख उड्डाणपूल, पाणीपुरवठा, सांडपाणी आणि आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पांना वेग आला आहे.
पुणे : पुणे महापालिकेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे; पण आता महापालिका प्रशासनाचीही लगबग सुरू झाली आहे.