

PMC Launches 'Abhay Yojana' with Tax Defaulters' Welcome
Sakal
पुणे : शहरातील प्रामाणिक करदाते न चुकता दरवर्षी मिळकतकर भरतात. त्यावेळी त्यांची रांगोळी काढून, फूल देऊन कोणी स्वागत करत नाही. साधे कौतुकही करत नाही. मात्र, अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या थकबाकीदारांचे महापालिकेच्या कार्यालयांत जोरदार स्वागत करण्यात आले. थकबाकीदारांनी पैसे भरल्याने शनिवारी विविध कार्यालयांमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. पहिल्या दिवशी सहा कोटी १५ लाख रुपये जमा झाले.