

PMC Aims to Clear Hurdles for Bavdhan-Pashan Road Widening
Sakal
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी चांदणी चौकाजवळील बावधन-पाषाण या विकास आराखड्यातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाची सोमवारी (ता. ३) पाहणी केली. वनविभाग व खासगी जागा मालकांकडून तातडीने भूसंपादन करून संबंधित रस्ता ३६ मीटर रुंद करण्याचे काम मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.