

PMC Baner Girl Hostel
Sakal
पुणे : पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात येणाऱ्या आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी महापालिकेकडून बाणेरमध्ये अद्ययावत वसतिगृह उभारण्यात येत आहे. वसतिगृहाच्या इमारतीच्या चार मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, मार्च २०२६ पर्यंत वसतिगृहाचे संपूर्ण काम महापालिका प्रशासनाकडून पूर्ण केले जाणार आहे.