

PMC Bans Bonfires Due to Air Pollution
Sakal
पुणे : थंडी वाढली आहे. त्यामुळे खासगी, सरकारी कार्यालये, आस्थापना, गृहप्रकल्पांच्या प्रवेशद्वारांवर, सार्वजनिक ठिकाणांवर शेकोट्या पेटवून त्याभोवती ऊब घेणारे नागरिक बसल्याचे चित्र दिसू लागले आहे. पण आता यापुढे कुठेही शेकोटी पेटविल्याचे निदर्शनास आले, तर महापालिकेडून कारवाई केली जाणार आहे. शेकोट्यांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याने प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.