

PMC Restarting Biometric Attendance
Sakal
पुणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची ऑनलाइन हजेरी बंद झाल्याने ‘आओ जाओ...घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली होती. हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर आता प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन ठेकेदार नियुक्त करून महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ६० मशिन बसविण्यात येणार आहेत. सर्व खातेप्रमुख व उपायुक्तांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोंदणी करून घ्यावी, असा आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी काढला आहे.