PMC Scraps ₹4.5 Crore Book Purchase Proposal
Sakal
पुणे : शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे सहा महिने शिल्लक असताना महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला साडे चार कोटी रुपयांची पूरक व व्यावसायिक पुस्तके खरेदीचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित प्रस्ताव दफ्तरी दाखल केल्याचे शुक्रवारी सांगितले.