

PMC Enforces Bulk Waste Processing
Sakal
पुणे : शहरात दररोज १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना (बल्क वेस्ट जनरेटर) प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्प बंद आहेत, असे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रकल्प बंद असलेल्या संस्था व सोसायट्यांचे आता सर्वेक्षण करून त्यांना कचरा प्रक्रिया प्रकल्प तत्काळ सुरू करण्याचे महापालिकेने सांगितले आहे.