

PMC Fines on Unhygienic Practices
Sakal
स्वारगेट : कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत दंडात्मक कारवाई केली आहे. जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १ हजार ७७८ जणांवर कारवाई करत तब्बल १० लाख ६९ हजार ८६४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.