

Pune Corporation Loses ₹2 Crore
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या भांडार विभागाकडून नऊ वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कापड, साड्या खरेदी केल्या. पण हे साहित्य वाटप न करता गोदामात ठेवून देण्यात आले. दोन वर्षापूर्वी घनकचरा विभागासाठी इकोचिप पावडर खरेदी केली ती देखील विनावापर पडून आहे. यात महापालिकेचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण ठेकेदारांचे बिलही वेळेवर दिले आहेत. यात भ्रष्टाचार झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.