

Shifting of Hundreds of Voters Exposed
Sakal
पुणे : महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदारयादी केल्यानंतर आता त्यातील मतदारांची पळवापळवी समोर येण्यास सुरुवात झाल्याने इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. एका प्रभागातील शेकडोंच्या संख्येने मतदार अन्य प्रभागांत टाकण्यात आले आहेत. यामध्ये भौगोलिक हद्दीचे पालन झाले नाही. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी अनेक गंभीर त्रुटी समोर आणल्या असून, प्रशासनाच्या कामावर आक्षेप घेतले जात आहेत.