

BJP–Shiv Sena Seat-Sharing Dispute Escalates Ahead of Pune PMC Elections
esakal
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील जागावाटपाचा वाद चिघळला आहे. महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेनेला भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्याने पक्षात कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपने शिवसेनेला सुरुवातीला केवळ १२ जागांची ऑफर दिली होती, तर नंतर ती वाढवून १५ जागांपर्यंत नेली. मात्र शिवसेनेची मागणी किमान ३५ ते ४५ जागांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा किंवा स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात येत आहे.