

BJP to Decide Candidates via Survey
Sakal
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून, आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली जात आहे. त्यातच आता भाजपचा उमेदवार ठरविण्यासाठी पक्षाकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याचे भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे प्रभारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.