

PMC to Increase Garbage Transport Fleet
Sakal
पुणे : महापालिकेच्या गाड्या कचरा उचलण्यासाठी उशिरा येत असल्यावरून प्रशासन आणि स्वच्छ संस्थेमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यावर तोडगा म्हणून कचरा वाहतूक करणाऱ्या ‘बीआरसी’ या १० ते १२ टन कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या दहाने वाढवली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी आज हे आदेश दिले.