

PMC Halts Road Digging Work for Rule Violation
Sakal
पुणे : शहरात रस्ते खोदाई करताना नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम महापालिकेने स्थगित केले आहे. खोदकाम केलेले रस्ते आधी दुरुस्त करा, फोटोसह त्याचा अहवाल सादर करा, मगच पुढची परवानगी दिली जाईल, अशी नोटीस पथ विभागाने ठेकेदाराला बजावली आहे. मनमानी खोदाईच्या विरोधात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता.