
PMC Recruitment
Sakal
पुणे : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांऐवजी आता १६९ जागांची भरती केली जाणार असून, त्यासाठी अर्ज भरण्यासाठी एक ऑक्टोबरपासून मुदत सुरू होणार आहे. प्रशासनाच्या संथ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत ही भरती रखडल्याने तब्बल २८ हजार ७०० उमेदवार हवालदिल झाले. आता पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाढीव जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया वेळेत पार पडली नाही तर पुन्हा एकदा निवडणुकीच्या कचाट्यात हे उमेदवार अडकणार आहेत.