

Pune Municipal Corporation Warns Builders Against Unsafe Construction Work During Diwali Holiday Worker Safety Rules Explained
esakal
पुणे : दिवाळीच्या सुट्टीत अनेक कामगार गावी जात असल्याने बांधकामस्थळांवर कमी मनुष्यबळात काम सुरू ठेवले जाते. त्यातून कामाचा ताण वाढून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते आणि अपघात घडण्याची शक्यता निर्माण होते. असे अपघात टाळण्यासाठी पुणे महापालिकेने बांधकामस्थळांवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, कामगारांचा जीव धोक्यात घालून कामे करून घेऊ नयेत. जर कमी मनुष्यबळात काम सुरू असले तर महापालिकेच्या अभियंत्यांनी अशा ठिकाणी कामांना मनाई करावी, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदारांनीही या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहेत.