

PMC Junior Engineer Recruitment Stuck in the Political Maze
Sakal
पुणे : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाच्या १७१ जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी तब्बल ४० हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. पण महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून वेळकाढूपणा केल्याने आता वेळ अपुरा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत ही भरती अडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.