

Faculty of Pune Medical College Skip Hospital Duties
Sakal
पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी व साहाय्यक प्राध्यापकांनी कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी सेवा देणे आवश्यक असताना ते येत नाहीत. त्यामुळे इतर रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत. त्यांची तक्रार रुग्णालयाने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.