

Pune Launches 'Pothole-Free Pune Campaign
Sakal
पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ॲप तयार केले, अभियंत्यांना कडक कारवाईचे आदेश दिले, तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजविण्यासाठी पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्ड्यांचा शोध घेऊन ते बुजविणार आहे.