

PMC Launches 'Pothole-Free Roads Campaign' from November 3
Sakal
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना आता महापालिका प्रशासनाने ‘खड्डेमुक्त रस्ते अभियान’ राबविण्याचे निश्चित केले आहे. महापालिका १५ पथके तयार करणार असून, सात ठेकेदारांच्यामार्फत रस्त्यांच्या दुरुस्तीवर भर दिला जाणार आहे. तीन नोव्हेंबरपासून या अभियानास सुरवात होणार आहे.