

19 PPP Road Projects Stalled in Pune
Sakal
पुणे : महापालिकेकडून शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील १९ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. यासंबंधी थंडावलेल्या प्रक्रियेस व कामांना गती देण्यासाठी हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले.