

PMC Plans 'Abhay Yojana' for Property Tax Defaulters
Sakal
पुणे : महापालिका निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महापालिका प्रशासनाने मिळकतकराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून ‘बक्षीस’ देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासंबंधीचा मंजुरीचा प्रस्ताव आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. प्रामाणिक करदात्यांना सवलत न देता दंडाची भीती दाखवली जाते, पण थकबाकीदारांचा दंड माफ करून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडविले जात असल्याचे यातून समोर येत आहे.