पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी अभूतपूर्व वाहतूककोंडी झाल्याने पुणेकरांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागले. पुणेकर या वाहतूक कोंडीत चार पाच अडकून पडले. राजाराम पूल बंद केल्याने ही कोंडी निर्माण झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता राजाराम पूल बंद करणाऱ्या ठेकेदाराला आता महापालिकेने आता नोटीस बजावली आहे. महापालिका या ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.