

PMC seeks permission from Agriculture Department for land to start sewage treatment plant
पुणे : सांडापणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३० गुंठे जागा महापालिकेला ताब्यात मिळावी यासाठी गेल्या पाचसहा वर्षापासून प्रयत्न आहेत. वारंवार पाठपुरावा करून ही जागा ताब्यात देण्याचे आदेश महापालिकेने आणले. त्यानंतरही जागा ताब्यात मिळत नसल्याने महापालकिने हात टेकले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आता थेट कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र पाठवून या जागेवर काम सुरू करण्यासाठी परवानगी द्या, काम सुरू होत नसल्याने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे असे पत्रात नमूद केले आहे.